Petrol Diesel Price : केंद्र सरकारकडून मोठा दिलासा, देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

| Updated on: May 21, 2022 | 9:19 PM

पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.

Follow us on

नवी दिल्ली : देशवासियांना लवकरच मोठा दिसाला देण्याच्या तयारीत केंद्र सरकार (Central Government) आहे. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. लवकरच इंधनाचे दर (Fuel Price)कमी होणार आहेत. तशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी केलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत होत्या. आता केंद्राच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.