Pimpri Chinchwad : हुंड्यासाठी आणखी एक बळी; लग्नाच्या 5 महिन्यातच विवाहितेने संपवलं जीवन
Pooja Nirval dowry death case : हुंडाबळीमुळे विवाहितेचा छळ झाल्याने 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. 22 वर्षीय विवाहितेने एक महिन्यापूर्वी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सासरी मुलीचा छळ होत होता, तिने आत्महत्या नाही तर तिची हत्या झाली असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे. मृत महिलेचा पती आणि नणंदे विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र घटनेला महिना उलटूनही आरोपी अद्यापही मोकाट आहेत. दुचाकी घेण्यासाथी 50 हजार दिले नाही म्हणून या विवाहितेचा छळ करण्यात आला. तसंच तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचाही आरोप महिलेच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. पूजा निर्वळ असं या मृत तरुणीचं नाव आहे. लग्नाच्या 5 महिन्यांनीच पूजाने आत्महत्या केली आहे. गजानन निर्वळ आणि राधा विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: May 25, 2025 04:06 PM
