आता रबी हंगामातही PM किसान विमा योजना, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे अंतिम मुदत
पीएम किसान विमा योजना आता रब्बी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुग या पिकांचा यात समावेश आहे.
पंतप्रधान फसल बीमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana), म्हणजेच पीएम किसान विमा योजना, आता रब्बी हंगामातील पिकांसाठीही लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्त्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. रब्बी हंगामासाठी, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात (उन्हाळी) आणि उन्हाळी भुईमुग यांसारख्या प्रमुख पिकांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
Published on: Nov 01, 2025 05:42 PM
