थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले ‘त्या’ विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार, बघा व्हिडीओ

| Updated on: Apr 17, 2024 | 5:14 PM

आज रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला सूर्य किरणांचा अभिषेक घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानात अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सूर्य किरण अभिषेक सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं.

Follow us on

देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. अयोध्येसह देशभरात रामभक्तांचा रामनामासह जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच आज रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला सूर्य किरणांचा अभिषेक घालण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानात अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सूर्य किरण अभिषेक सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या दर्शनास जाऊ शकले नाही. मात्र ते विमानातून प्रवास करताना या विलक्षण सोहळ्याचे आणि त्या विशेष क्षणाचे साक्षीदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या सोहळ्याचे प्रक्षेपण पाहत असताना आपल्या पायातील बूट देखील काढून ठेवले होते. भाजपकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोवरून पंतप्रधान मोदींचे नेटकरी चांगलेच कौतक करत आहेत. मोदींची ही कृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अयोध्येत जानेवारी महिन्यात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिल्या प्रथमच अयोध्येतील राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.