PM Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला कॉंग्रेसचं समर्थन नाही, हे दुर्दैव; मोदींनी व्यक्त केली खंत
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच वादंग बघायला मिळालं.
जगातील कोणत्याही देशाने भारताला आपल्या सुरक्षेतपासून कारवाई करण्यापासून रोखलं नाही. जगाचं समर्थन मिळालं. जगातील देशांचं समर्थन मिळालं, पण दुर्भाग्य म्हणजे माझ्या देशातील विरांच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेच्या सभागृहात बोलताना व्यक्त केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. त्यावेळी मोदी बोलत होते.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्र, १९३ देशात फक्त तीनच देश ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानच्या बाजूने बोलले होते. ग्रीक्स, फ्रान्स, जर्मनी कोणत्याही देशाचं नाव घ्या, सर्व देशाने जगाने भारताला समर्थन दिलं आहे. जगाचं समर्थन मिळालं. जगातील देशांचं समर्थन मिळालं, पण दुर्भाग्य म्हणजे माझ्या देशातील विरांच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही. २२ एप्रिल नंतर तीन चार दिवसातच हे उड्या मारत होते. कुठे गेली ५६ इंचाची छाती, कुठे हरवले मोदी, मोदी तर फेल गेले. काय मजा घेत होते. त्यांना वाटत होतं की वाह बाजी मारली. त्यांना पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येतही राजकारण पाहत होते, अशीही टीका मोदींनी केली आहे.
