PM मोदी यांचे अरुणाचलच्या राजधानीत जोरदार स्वागत, नारी शक्तीचे दर्शन आणि तरुणात खासा उत्साह, Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांचे ईटानगर येथे अरुणाचलच्या जनतेने जोरदार स्वागत केले आहे. येथे पंतप्रधान यांच्या एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर तेथील जनतेला पंतप्रधानांनी संबोधित केले.
अरुणाचल प्रदेशाची राजधानी ईटानगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक हातात भारताचे झेंडे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना दिसले. अरुणाचल येथील जनता पारंपारिक पोशाखात पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी पोहचली होती. या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. यात नारी शक्ती आणि युवाशक्तीचे दर्शन झाले. अनेक तरुण आणि तरुणी मोबाईलवर पंतप्रधानांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील जनतेला हात दाखवत त्यांचा उत्साहात सहभागी होताना दिसत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रती लोकांचा उत्साह दांडगा दिसत आहे. व्हिडिओ पाहा…
Published on: Sep 22, 2025 10:24 PM
