The Modi Factor : ‘ती’ 11 वर्षे… विकसित भारताचा अमृतकाल… 11 वर्षात मोदी सरकारनं काय-काय केलं?
९ जून २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता हाती घेतली आहे. पण प्रश्न असा आहे की या ११ वर्षात देशात काय बदल झाला? गरीब, शेतकरी, देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या जीवनामध्ये नेमका काय बदल झालाय का? भारताला एक नवीन ओळख कशी मिळाली आहे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांद्वारे पंतप्रधान मोदींची पोहोच प्रत्येक घरात कशी पोहोचली आहे?
११ वर्षांपूर्वी भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या सिंहासनावर दूरदृष्टी असलेला एक नेता बसला होता. त्याचं नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याने भारतात एका नवीन युगाची सुरुवात झाली आणि आजही तो कारवा नेहमीप्रमाणे कायम आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली आहे आणि या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ कठोर निर्णयच घेतले नाहीत तर त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांनी देशाची स्थिती आणि दिशाही बदलली आहे.
सामान्य जीवनातील अडचणींना अगदी जवळून अनुभवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांना त्यांच्या जीवनाचा आधार बनवलं आणि जेव्हा त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी त्या अनुभवाचं सार्वजनिक धोरणात रूपांतर केलं आणि देशात क्रांतिकारी बदलाची घोषणा केली.
या ११ वर्षात पंतप्रधान मोदींनी असे अनेक कठीण निर्णय घेतले ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. ते निर्णय ज्यांनी भारताला जगात एक नवीन ओळख मिळवून दिली. मोदींनी घेतलेल्या ११ सर्वात मोठ्या निर्णयांबद्दल एक एक करून संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ. ज्यांनी देशातील लोकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणलेच नाही तर जागतिक स्तरावर भारताचा प्रभावही वाढवला.
