PM Modi : गूडन्यूज.. सरकारकडून तरूणांना 15 हजार; विकासित भारत रोजगार योजना आजपासून सुरू

PM Modi : गूडन्यूज.. सरकारकडून तरूणांना 15 हजार; विकासित भारत रोजगार योजना आजपासून सुरू

| Updated on: Aug 15, 2025 | 9:56 AM

जीएसटीच्या आढाव्यासोबतच पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना पहिली नोकरी मिळाल्यावर १५,००० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल.

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करत देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी काही मोठ्या घोषणा केल्यात.  यंदाच्या दिवाळीत जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मोदींनी केली. यामुळे देशातील जनतेला कमी कर भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे देशातील युवकांसाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंदाची बातमी दिली. मोदी म्हणाले, आज १५ ऑगस्ट रोजी आपण देशातील युवकांसाठी १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना आजपासून सुरू करण्यात आली असून या योजनेतंर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारकडून १५,००० रुपये देण्यात येणार आहे. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वासही मोदींनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे. तसेच या योजनेअंतर्गत पुढील २ वर्षात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Published on: Aug 15, 2025 09:56 AM