महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांची भरघोस मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jan 25, 2023 | 9:19 AM

महाराष्ट्रात जेव्हापासून युतीचं सरकार आलं तेव्हापासून आमचं मंत्रिमंडळ काम करतंय, यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.

Follow us on

लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक योजना, प्रकल्प आणि निधी मिळावा यासाठी कोणते प्रयत्न असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हापासून युतीचं सरकार आलं तेव्हापासून मी, देवेंद्र फडणवीस आणि आमचं मंत्रिमंडळ काम करत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यासह इतर विभागाकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत होत आहे. विविध योजना आणि प्रकल्पाला पाठिंबा मिळतोय. या अर्थसंकल्पात केंद्राकडून चांगलं सहकार्य मिळेल, अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली दौऱ्यानंतर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील मंत्रिमंडळ लवकरच होणार आहे. तर आगामी पोटनिवडणुकांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात एक परंपरा आहे. एखाद्या जागेवर त्या जागेच्या सदस्याचं निधन होतं. तेव्हा सर्वजण सहकार्य करतात. ती निवडणूक बिनविरोध होते. याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं. बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर आम्ही माघार घेतली. हीच परंपरा सर्वांनीच पाळली पाहिजे. जपली पाहिजे.