Independence Day 2021| लाल किल्ल्यावर ऑलिंपिकमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंसाठी टाळ्या

Independence Day 2021| लाल किल्ल्यावर ऑलिंपिकमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंसाठी टाळ्या

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 8:58 AM

आपल्या भाषणच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडुंचे स्वागत केले. या खेळाडुंनी केवळ आपली मनं जिंकलेली नाहीत तर त्यांनी भविष्यातील नव्या पिढीली प्रेरणा दिली आहे. त्यासाठी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

लाल किल्ल्यावर ऑलिंपिकमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंसाठी टाळ्या. आपल्या भाषणच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडुंचे स्वागत केले. या खेळाडुंनी केवळ आपली मनं जिंकलेली नाहीत तर त्यांनी भविष्यातील नव्या पिढीली प्रेरणा दिली आहे. त्यासाठी आपण त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करुयात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा भारतीयांनी कोरोनाशी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. संपूर्ण जगासमोर आजघडीला कोरोनाचं आव्हान आहे. पण भारतीयांनी संयम, धैर्य आणि असाधारण गतीने काम केले. ही समाधानाची बाब असली तरी ही स्वत:ची पाठ थोपटून निश्चिंत होण्याची वेळ नाही. मात्र, त्याचवेळी भारतासमोर कोणतेही आव्हान नव्हते असे म्हणण्याचा करंटेपणा भविष्यातील विकासातील अडथळा ठरेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.