PM MODI Uncut :  ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय… पंतप्रधान मोदींचं  मोठं विधान

PM MODI Uncut : ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय… पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

| Updated on: May 12, 2025 | 8:48 PM

'भारताचे तिन्ही दलाने, बीएसएफ, अर्ध सैनिक दल सतत अलर्टवर आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आता नवीन लाईन खेचली आहे. '

ऑपरेशन सिंदूरनंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत, असं म्हणत ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलं असल्याचे म्हणत मोठं वक्तव्य केलं. मोदी यावेळी असेही म्हणाले की, भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं. अनेक अतिरेकी मारले होते. पाकिस्तानच्या हृदयातील दहशतवाद्यांचे अड्डे भग्न करून सोडले होते. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानकडून याचना केली गेली, असे सांगितले.

Published on: May 12, 2025 08:48 PM