विनायक मेटे यांच्या निधनानंतर पोलीस रिपोर्ट तयार

| Updated on: Aug 14, 2022 | 4:07 PM

पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवर कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने मेटेंचे वाहन पुढच्या वाहनाला जाऊन धडकले. या अपघातात मेटे याचे सुरक्षा रक्षक राम ढोबळेही कार मध्ये अडकले होते. या घटनेतही तेही गंभीर जखमी झाले आहे.

Follow us on

मुंबई – शिवसंग्राम नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या निधनानंतर त्याच्या पोलीस रिपोर्ट(Police Report) तयार करण्यात आला आहे. त्यातील महत्वाच्या बाबी म्हणजे पहाटे 5  वाजून पाच मिनिटांनी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर 5 वाजून  58  मिनिटांनी रसायनी पोलिसांना अपघाताची सर्वात आधी माहिती मिळाले. त्यानंतर 6:08  मिनिटांनी पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या सात मिनिटात पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. मात्र अपघातानंतर तासाभरामध्ये त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवर(Pune-Mumbai Expressway) कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने मेटेंचे वाहन पुढच्या वाहनाला जाऊन धडकले.या अपघातात मेटे याचे सुरक्षा रक्षक राम ढोबळेही कार मध्ये अडकले होते. या घटनेतही तेही गंभीर जखमी झाले आहे.