BJP | पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला, म्हणाले….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “काही लोक मोठमोठी आणि लांबलचक पत्रं लिहितात. देशात जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आहेत. देश सुरक्षित ठेवायचा असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवारांवर निशाणा साधला. “सोनं जेव्हा 500 ते 9000 रुपयांपर्यंत होतं तेव्हाही सामान्यांना ते खरेदी करता आलं नाही आणि आज दीड लाखांवर गेलं तरी परिस्थिती तीच आहे. पंतप्रधान मोदी यांनी फक्त एक वर्ष सोनं खरेदी टाळा असं सांगितलं, त्यावर लगेच बोंब मारायला सुरुवात झाली,” असा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले, “बारामतीच्या पट्ट्यातून लगेच लांबलचक पत्र लिहून मोदींना सल्ले देण्याची काय गरज होती?” तसेच, “भारताचं परराष्ट्र धोरण आज इतकं मजबूत आहे की जगात कोणीही आपला हात धरू शकत नाही,” असेही ते म्हणाले. या प्रतिक्रियांमुळे राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा वेग आला आहे.