नागपूर बाहेरूनच चांगलं दिसतंय… सत्ताधाऱ्यांनी डोळ्याला चष्मा लावलाय का?; प्रफुल्ल पटेलांचा भाजपला घरचा आहेर

नागपूर बाहेरूनच चांगलं दिसतंय… सत्ताधाऱ्यांनी डोळ्याला चष्मा लावलाय का?; प्रफुल्ल पटेलांचा भाजपला घरचा आहेर

| Updated on: Jan 11, 2026 | 12:51 PM

बाहेरून नागपूर सुंदर दिसतं. पण इथे तर दिव्याखाली अंधार आहे, असा टोला एनसीपी नेते प्रफुल पटेल यांनी भरसभेतून भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नागपूरची अत्यंत वाईट स्तिथी आहे, असं म्हणत पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी युतीत सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. बाहेरून नागपूर सुंदर दिसतं. पण इथे तर दिव्याखाली अंधार आहे, असा टोला एनसीपी नेते प्रफुल पटेल यांनी भरसभेतून भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नागपूरची अत्यंत वाईट स्तिथी आहे, असं म्हणत पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. नागपूरमध्ये मोठ-मोठे नेते आहेत. परंतु शहराची दुर्दशाच आहे. आजारी असाल तर कुठे दवाखान्यात जाऊ नाही शकत अशी वाईट परिस्तिथी या नागपूरमध्ये आहे. शासनकर्त्यांनी डोळ्याला चष्मा लावला आहे का? असा सवाल पटेल यांनी केलाय. ह्या देशात आणि राज्यातील सत्तेत आम्ही आहोत आणि आम्ही काम पण करत अहोत, विरोधकांनी उगाच गैरसमजात राहू नका, असा टोला प्रफुल पटेल यांनी लगावला आहे.

Published on: Jan 11, 2026 12:51 PM