यापुढे काळजी घेऊ… मोदींना ‘जिरेटोप’ अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय?

| Updated on: May 15, 2024 | 1:48 PM

वराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आंनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी मोदींना जिरेटोप डोक्यावर घातला. यावरून विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरच प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

वराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आंनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी मोदींनी गंगा घाटावर आरती केली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्याचे मुख्यमंत्री देखील हजर होते. तर राज्यातून मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मोदींना जिरेटोप डोक्यावर घातला. यावरून विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरच प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ’, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 15, 2024 01:48 PM