“माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर…,” राज्यातल्या दंगलींवरून प्रकाश आंबेडकर म्हणतात…

“माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर…,” राज्यातल्या दंगलींवरून प्रकाश आंबेडकर म्हणतात…

| Updated on: Jun 18, 2023 | 8:35 AM

शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद : शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट स्टेटसला ठेवली म्हणून वाद निर्माण झाला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय होऊ देता म्हणून होतो”, अशी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

Published on: Jun 18, 2023 08:35 AM