अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल

अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल

| Updated on: Jul 28, 2025 | 7:57 PM

एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून आता पुणे पोलिस आयुक्त आणि ससून रुग्णालयाला पत्र देण्यात आलं आहे.

एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांकडून आता पुणे पोलिस आयुक्त आणि ससून रुग्णालयाला पत्र देण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडीओ फुटेज देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतलेल्या फुटेजची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी एक पोस्ट देखील केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये खडसे यांनी म्हंटलं आहे की, या संदर्भात एकनाथ खडसे यांनी एका पोस्टच्या माध्यमातूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे ? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

Published on: Jul 28, 2025 07:56 PM