प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी
पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या जावया प्रांजल खेवलकर यांची अटक झाली. त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. आज या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. ज्यात पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने खेवलकर यांच्यासह चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, ज्यामुळे खेवलकर यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रांजल खेवलकर आणि इतर चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या वकिलाच्या गणवेशात न्यायालयात उपस्थित होत्या. खेवलकर आणि इतर चार आरोपींची पोलिस कोठडी आज संपली होती.
Published on: Jul 31, 2025 06:23 PM
