Pravin Darekar | केंद्र सरकार आणि भाजपच्या बाबतीत काहींना कावीळ झालीय, दरेकरांचा संजय राऊतांना टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. पेट्रोल-डिझेलच्या किमती 100 रुपयांनी वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल यांनी केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सरकारमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं काल पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. पेट्रोल-डिझेलच्या किमती 100 रुपयांनी वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल यांनी केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय. किमान कौतुकाची अपेक्षा होती पण त्यांनी टीका केली. पराभव झाला म्हणून सरकारला जाग आली, असं राऊत म्हणाले. पण पंढरपूर, जिल्हा परिषदेत ते पराभूत झाले. महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत आणि तुम्ही निद्रिस्त आहात. मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या नंबरवर जातोय. राज्यात शेतकरी, एसटी कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, तरी तुम्ही निद्रिस्त आहात. जागे व्हा आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, अशी खोचक टीका दरेकर यांनी केलीय.
