फळ लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतात, म्हणून मुंबै बॅंकेला बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रविण दरेकर

फळ लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतात, म्हणून मुंबै बॅंकेला बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रविण दरेकर

| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 11:15 PM

मुंबै बॅंकेच्या सहकार पॅनेलचे प्रविण दरेकर, प्रसाद लाड, आणि आनंदराव गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध करण्यासाठी सहकार पॅनल प्रयत्न करणार आहे. बॅंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुंबई : मुंबै बॅंकेच्या सहकार पॅनेलचे प्रविण दरेकर, प्रसाद लाड, आणि आनंदराव गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध करण्यासाठी सहकार पॅनल प्रयत्न करणार आहे. बॅंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर फळ लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतात. म्हणूनच मुंबई बॅंकेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तरी देखील आज सर्व सभासदांनी आम्हाला बिनविरोध निवडून दिलं, असे प्रविण दरेकर म्हणाले.

Published on: Dec 03, 2021 11:15 PM