Video | विक्रोळी संरक्षण भिंत दुर्घटनेत कंत्राटदार, मनपा अधिकाऱ्यांकडून निकृष्ट दर्जाचे काम : प्रविण दरेकर
कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाच कामं करण्यात आलं, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मुंबई : मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे संरक्षण भिंत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिली. या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाच कामं करण्यात आलं, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
