Pravin Gaikwad : आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप

Pravin Gaikwad : आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 14, 2025 | 5:11 PM

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील मारहाण प्रकरणी आता काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील मारहाण प्रकरणी आता काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. स्वत: प्रवीण गायकवाड यांनीच हे गंभीर आरोप केलेले आहेत. आरोपीवर हवी ती कलमं लावण्यात आलेली नाहीत, असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसंच अनेक मंत्र्यांकडून आणि गृहमंत्रालयातून देखील पोलिसांना या प्रकरणासंदर्भात पोलिसांना फोन गेले असल्याचा देखील आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान काळे फासण्यात आले होते. ही घटना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घडवल्याचा आरोप करण्यात आलेला होता. त्यानंतर आता स्वत: प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केलेले आहेत. यासंदर्भात स्वत: प्रवीण गायकवाड यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बातचीत केली आहे.

Published on: Jul 14, 2025 05:09 PM