Beed : ‘…अन् माझ्या बायकोचा जीव गेला’, हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पुण्यातील भिसे कुटुंबीयांकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. बीडच्या जिल्हा रूग्णालयात प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. इतकंच नाहीतर घडलेल्या घटनेनंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तर देण्यात आल्याचा आरोपही मृत महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या महिलेचे नाव छाया पांचाळ असल्याची माहिती मिळतेय. तर या संतापजनक प्रकारानंतर बीड जिल्हा रूग्णालय प्रशासनाचा माध्यमांशी बोलण्यास नकार पाहायला मिळत आहे. बघा नेमकं काय घडलं?
Published on: Apr 14, 2025 06:52 PM
