Sambhajinagar : करंट मशीनने चटके देत विवाहितेचा छळ; मारहाणीत 7 महिन्यांचा गर्भ पडला
Sambhajinagar Crime News : माहेरून पैसे आणण्याची मागणी करत महिलेला अमानुष मारहाण करून चटके दिल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेला सासरच्या मंडळींकडून मारहाण करत चटके देण्यात आले आहेत. सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे. करंट मशीनमधून चटके देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तर या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या माहेरच्या कुटुंबाने केली आहे.
राज्यात हुंड्यासाठी विवाहित महिलांच्या छळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या हुंड्याच्या त्रासाला कंटाळून केलेल्या आत्महत्येचे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच आता संभाजीनगर मधून देखील हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माहेरून 25 लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत महिलेला मरण करत करंट मशीनने चटके देण्यात आलेले आहेत. सासू, सासरे दीर आणि नणंद यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला गर्भवती असताना देखील तिच्या पोटावरही मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे 7 महिन्यांच्या या गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्याचंही या महिलेकडून सांगण्यात येत आहे.
