Pune Pregnant Death Case : ‘…ही चूक होती’, ‘ससून’च्या अहवालातील निष्कर्ष काय? ‘दीनानाथ’वर कारवाई होणार?

Pune Pregnant Death Case : ‘…ही चूक होती’, ‘ससून’च्या अहवालातील निष्कर्ष काय? ‘दीनानाथ’वर कारवाई होणार?

| Updated on: Apr 18, 2025 | 4:39 PM

पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. हा अहवाल ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती आला आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता, असा आरोप होत असताना या प्रकरणाची चौकशी विविध समित्यांकडून सुरु आहे. अशातच ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे. यातून काय समोर आले बघा…

गर्भवती महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसताना देखील इंदिरा आयव्हीएफमध्ये 4-5 दिवस दाखल करून घेणे चूक होती. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झालेले असताना गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यायला हवा होता.

अती जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेला नेण्याची गरज होती. मात्र तसं न करता त्या महिलेला सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी गर्भवती महिलेची प्रसृती झाली. मात्र त्या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट स्पेशलिस्ट उपलब्ध नव्हता.

अशावेळी महिलेला ह्रदयविकाराचा धोका वाढला होता. जवळपास दोन तास सीपीआर दिले जात होते मात्र ही गर्भवती महिला गुंतागुंतीचे रुग्ण असल्याचे दिसून आले आणि मणिपालमध्ये मृत्यू झाला.

असे ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे. हा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला होता. तोच अहवाल TV9 मराठीच्या हाती लागला आहे.

Published on: Apr 18, 2025 04:38 PM