PUNE : पुण्यात २४ तास उलटले तरीही बाप्पांच्या मिरवणुका सुरूच, १०० हून अधिक गणपतींचं विसर्जन बाकी

PUNE : पुण्यात २४ तास उलटले तरीही बाप्पांच्या मिरवणुका सुरूच, १०० हून अधिक गणपतींचं विसर्जन बाकी

| Updated on: Sep 29, 2023 | 1:56 PM

VIDEO | पुणे शहरात गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला तब्बल २४ तास उलटून गेले तरीही विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच, पुण्यात अजून १०० हून अधिक सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन बाकी असून दुपारी ३ वाजेपर्यंत या गणेश मिरवणुका आणि विसर्जन सुरूच राहणार असल्याची शक्यता

पुणे, २९ सप्टेंबर २०२३ | गणेशोत्सव म्हटलं की मुंबई आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची चांगलीच चर्चा होताना दिसते. कारण या दोन्ही शहरात असणाऱ्या देखण्या आणि सुबक गणपती बाप्पांच्या मुर्त्या आणि दहाव्या दिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुका…गपणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोषात पुण्यात गणपती बाप्पा विसर्जनासाठी गुरूवारी दुपारीच मार्गस्थ झाले होते. पुणे शहरातील पाचही मानाच्या गणपतीचे वेळेत विसर्जन झाले. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या पाचही गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. मानाच्या पाचही गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पुणेच नाहीतर देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलावाई गणपतीचेही विसर्जन झाले. तर काल सुरू झालेल्या काही गणपती बाप्पाच्या या मिरवणुकीला तब्बल २४ तास उलटून गेले तरीही पुण्यात विसर्जन मिरवणुका या सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात अजून १०० हून अधिक सार्वजनिक गणपतीचे विसर्जन बाकी असून दुपारी ३ वाजेपर्यंत या मिरवणुका आणि विसर्जन सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे.

Published on: Sep 29, 2023 01:56 PM