Chhaava Film : ‘छावा’ चित्रपट बघणं ‘त्या’ दोघांच्या आलं अंगाशी, पोलिसांनी थेट ठोकल्या बेड्या, नेमकं कारण काय?
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा बघण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सर्वत्र बोलबाला असलेल्या हा ‘छावा’ सिनेमा बघण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी का बेड्या ठोकल्या याची सध्या चर्चा सुरू आहे.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा बघण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सर्वत्र बोलबाला असलेल्या हा ‘छावा’ सिनेमा बघण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी का बेड्या ठोकल्या याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोघे मकोकातील 2 आरोपी होते. त्यामुळे पोलिसांकडून या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील हडपसरमधील वैभव टॉकीज परिसरातून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहे. मकोकातील आरोपी असलेल्या धर्मेनसिंग आणि बादशाहसिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हडपसर मधील एक मल्टीप्लेक्स सिनेमागृहातून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे दोघे आरोपी फारर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिघी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या सिनेमात विकी कैशल याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा पाण्यासाठी दिवसेंदिवस प्रेक्षकांची संख्या वाढत असताना मात्र या दोन प्रेक्षकांना ‘छावा’ सिनेमा पाहणं चांगलंच महागात पडलं आहे.
