Ravindra Dhangekar : धंगेकर भटका कुत्रा, पुण्यातील भाजप नेते खवळले अन् ठाकरेंचे वसंत मोरे धंगेकरांच्या साथीला, म्हणाले…
पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. वसंत मोरे यांनी धंगेकरांना पाठिंबा दिला, तर श्रीनाथ भिमाले यांनी धंगेकरांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या जमीन व्यवहाराचे संपूर्ण पाप मोहोळ यांचे असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. नैतिकता म्हणून मोहोळांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.
धंगेकरांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून हा व्यवहार तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे. धंगेकरांच्या या भूमिकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यातले भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी मात्र धंगेकरांवर टीका केली आहे. जैन बोर्डिंग प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवारवाड्याचा मुद्दा समोर आणला जात असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे.
