Kaustubh Ganbote Death In Pahalgam : ‘आमच्या कौस्तुभचं असं काही होईल हे वाटलंच नाही’; पहलगाममधील मृत कौस्तुभच्या काकींना अश्रु अनावर

Kaustubh Ganbote Death In Pahalgam : ‘आमच्या कौस्तुभचं असं काही होईल हे वाटलंच नाही’; पहलगाममधील मृत कौस्तुभच्या काकींना अश्रु अनावर

| Updated on: Apr 23, 2025 | 12:04 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. त्यांचं कुटुंब आता काश्मीरकडे रवाना झालेलं आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये काल दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. यात 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत. या हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेने देशासह जगभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. यातील 3 डोंबिवली, 1 नवी मुंबई आणि 2 पुण्यातील रहिवाशी आहेत. पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचं कुटुंब आता काश्मीरला रवाना झालं आहे. यावेळी कौस्तुबच्या काकींना अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले. यावेळी बोलताना कौस्तुभच्या काकी म्हणाल्या की, ‘कौस्तुबसोबत घरातले 5 जण जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. अशी घटना झाली हे आम्हाला काल समजलं होतं. पण त्यात कौस्तुभ असेल असं वाटलं नव्हतं. आमचा त्यांच्याशी शेवटचा संपर्कसुद्धा होऊ शकला नाही. त्यांच्यासोबत गेलेल्यांशी देखील अजूनही आमचा संपर्क होत नाही आहे’, हे सांगताना कौस्तुभच्या काकींना आपले अश्रु अनावर झाले.

Published on: Apr 23, 2025 12:04 PM