Pune Mock Drill : पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल

Pune Mock Drill : पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल

| Updated on: May 06, 2025 | 6:23 PM

भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती वाढली आहे. यात जर देशावर हल्ला झाला तर नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी यासाठी उद्या देशात सगळ्या राज्यांनी मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना गृह खात्याकडून देण्यात आलेल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना नागरी संरक्षणासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. ७ मे रोजी एक मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. उद्या पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी हे मॉक ड्रिल होणार आहे. यात महत्वाच्या आणि संवेदनशील भागांचा समावेश आहे. पुण्यातले महत्वाचे चौक, पोलीस स्टेशन, काही सिनेमागृह आणि पुणे रेल्वे स्थानकावर सुद्धा हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे. एकूण 76 ठिकाणी सायरन देखील लावण्यात आलेले आहे.

Published on: May 06, 2025 06:23 PM