शरद पवारांनी घेतलं संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

शरद पवारांनी घेतलं संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

| Updated on: Apr 24, 2025 | 10:03 AM

श्रीनगरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 पर्यटक हे पुण्यातील होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यासाठी शरद पवार यांनी स्वत: दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

जम्मू काश्मीरमील श्रीनगरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे अशी त्यांची नावं आहेत. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी देखील कर्वेनगर येथे जगदाळे कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर शरद पवार कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. यावेळी गनबोटे कुटुंबाची सांत्वनपर भेट शरद पवार यांनी घेतली. दोन्ही पार्थिवयांच्या अंतिम दर्शनासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. यावेळी उपस्थितांकडून ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत.

Published on: Apr 24, 2025 10:02 AM