भाजप आमदाराच्या पीएच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या पाटीला फासलं काळं

भाजप आमदाराच्या पीएच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या पाटीला फासलं काळं

| Updated on: Apr 04, 2025 | 1:25 PM

पुण्यातील संतापजनक प्रकारानंतर आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर धडकले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची मुजोरी पाहायला मिळाली. दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी आडमूठी मागणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून करण्यात आली. मात्र दहा लाख रूपये भरले नाही म्हणून गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पुणे रूग्णालय प्रशासनाविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी आहे. पुण्यात या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. घडलेल्या प्रकारानंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून सकाळपासून आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलकांनी मोठ-मोठ्यांनी घोषणाबाजी केली तर काही आंदोलकांनी चिल्लर फेक देखील केली. अशातच पुण्यातील पतीत पावन संघटना देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आक्रमक होत त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पतीत पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या नावाला काळं फासण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

Published on: Apr 04, 2025 01:25 PM