महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एकता मिसळ महोत्सव; चंद्रकांत पाटील यांच्याकडून मिसळला फोडणी

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एकता मिसळ महोत्सव; चंद्रकांत पाटील यांच्याकडून मिसळला फोडणी

| Edited By: | Updated on: Apr 11, 2023 | 8:31 AM

Chandrakant Patil : मी मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही; चंद्रकांत पाटील यांचं पुण्यात वक्तव्य. पाहा व्हीडिओ...

पुणे : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एकता मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्त पुण्यात ५ हजार किलोची मिसळ बनवण्यात येणार आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या प्रांगणात एकता मिसळ मोहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मिसळ बनवण्यासाठी हातभार लावला. चंद्रकांत पाटलांनी मिसळीला फोडणी दिली. तेव्हा त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. “मी आज मिसळीला फोडणी टाकली वादाला नाही. मिसळीचा आस्वाद देखील घेतला. समतेचा संदेश आज मी सगळ्यांना देऊ इच्छितो. महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यायलाच हवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नक्की देतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 11, 2023 08:30 AM