‘ही’ गोष्ट अजितदादांना कळते, बाकीच्यांना कधी कळणार?; चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना सवाल

‘ही’ गोष्ट अजितदादांना कळते, बाकीच्यांना कधी कळणार?; चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना सवाल

| Edited By: | Updated on: Apr 09, 2023 | 1:38 PM

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांला टोला लगावलाय. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मात्र कौतुक केलं आहे. पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणालेत...

पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांला टोला लगावला आहे. काही प्रश्न विचारले आहेत. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मात्र कौतुक केलं आहे. सर्व विरोधी पक्षांना आवाहन आहे की, मुद्द्यावर लढले पाहिजे. अजित पवार यांना जे कळलं ते बाकीच्यांना कधी कळणार?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. सगळया निवडणुका होईपर्यंत महाविकास आघाडी एकत्रित राहील, असं वाटत नाही. तिघे लढले तर आम्हला फायदा आणि वेगवेगळे लढले तर आमचा फायदा आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 09, 2023 01:38 PM