Pune : भाऊबीजेला महागडी कबुतरं घ्यायची अन् रंगवून… पुण्याच्या भोरमधली अनोखी प्रथा तर बघा काय?

| Updated on: Oct 23, 2025 | 4:22 PM

पुण्याच्या भोरमध्ये दिवाळीतल्या भाऊबीजेदिवशी कबूतर प्रेमींकडून एक अनोखा खेळ खेळला जातो.  या कबुतरांच्या खेळाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.

पुण्याच्या भोरमध्ये दिवाळीतल्या भाऊबीजेदिवशी कबूतर प्रेमींकडून एक अनोखा खेळ खेळला जातो.  या कबुतरांच्या खेळाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. दिवाळीमध्ये सर्व कबुतरखान्याचा मालक एकत्रित वर्गणी गोळा करून, वेगवेगळ्या भागातून चांगली महागडी जातीवंत कबूतर खरेदी करून आणतात.. त्यांना कलर देऊन गावकीच्या वतीने विविध ठिकाणाहून ही कबूतर आकाशात सोडली जातात. त्यानंतर कबुतरखान्याचा मालक आपल्या कबुतरखान्यातून कबूतरांचा थवा आकाशात सोडतात आणि आकाशात सोडलेली कलरवाली जातीवंत कबूतर आपल्या कबुतरांच्या थव्यात घेण्याचा प्रयत्न करत कबुतरखान्याच्या मालकांची स्पर्धा सुरू होते.

Published on: Oct 23, 2025 04:22 PM