Pune : लिफ्टचा वापर करताय? जरा जपून…लिफ्टमध्ये अडकून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

Pune : लिफ्टचा वापर करताय? जरा जपून…लिफ्टमध्ये अडकून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

| Updated on: Oct 03, 2025 | 6:00 PM

पिंपरी-चिंचवड येथील राम स्मृती सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय अमेय साहेबराव फडतरे याचा मृत्यू झाला. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दिघी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. चऱ्होली फाट्याजवळील राम स्मृती सोसायटीमध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अमेय साहेबराव फडतरे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकल्याने अमेला गंभीर दुखापत झाली. अग्निशामक दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. लिफ्टमध्ये सेन्सर होता का आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का, याची चौकशी केली जात आहे. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Published on: Oct 03, 2025 06:00 PM