Pune local election : तिकीट न मिळाल्यानं नाराज, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर थेट पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्…
पुण्यात उमेदवारी नाकारल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपनेही पुण्यात धक्कातंत्र वापरत अमोल बालवडकरांना डावलले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याशी जागावाटपावर चर्चा केली, तर जळगावात राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षांनी राजीनामा दिला.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी वाटपावरून नाराजी आणि पक्षांतर्गत मतभेद समोर येत आहेत. यात प्रामुख्याने पुण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रोष, भाजपमधील उमेदवारीचा तिढा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा यांचा समावेश आहे. पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कसबा पेठ येथील झांबरे चावडी शाखेत उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत. आपल्या पक्षाचा बॅनरच त्यांनी फाडून टाकला. प्रभागातून उमेदवारी मिळावी अशी इच्छा असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना डावलल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील पोस्टर देखील काढून टाकले. उमेदवारी नाकारल्याने शिवसैनिक नाराज झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
Published on: Dec 30, 2025 05:05 PM
