vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या चिमुकल्या बाळाची प्रकृती स्थिर

vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या चिमुकल्या बाळाची प्रकृती स्थिर

| Updated on: May 27, 2025 | 3:11 PM

Vaishnavi Hagawane Case Updates : पुण्यातील हुंडाबळी प्रकरणातील मृत वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या प्रकृतीबद्दल नवीन अपडेट समोर आलेली आहे.

शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता पुण्यातील मृत वैष्णवी हगवणेच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. या लहान बाळात आम्ही आमची वैष्णवी शोधतोय अशी प्रतिक्रिया यावेळी कसपटे कुटुंबाने दिली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने 16 मे रोजी सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. वैष्णवीचा शशांकसोबत प्रेमविवाह झालेला होता. यावेळी तिच्या घरच्यांनी कोट्यवधीचा हुंडा हगवणे कुटुंबाला दिला होता. वैष्णवीचे सासरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी आहेत. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीचा अधिक हुंड्यासाठी छळ सुरू झाला. माहेरून 2 कोटी आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला जात होता. या संपूर्ण प्रकरणात वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड झाली. त्यानंतर हे बाळ वैष्णवीच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल्यावर या बाळाची प्रकृती बिघडली होती. आता शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं आहे.

Published on: May 27, 2025 03:11 PM