Special Report | नारायण राणेंच्या इंग्रजीवर शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह!
बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मात्र तुम्ही विसरलात आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल लोकसभेमध्ये तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देखील देता आलं नाही आणि त्यावरून हशा पिकला आणि महाराष्ट्राची मान खाली गेली याबद्दल त्यांनी विचार करावा, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी माननीय संजय राऊत यांच्या जिभेवर संशोधन केले पाहिजे अशी टीका केली आणि त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरु मानू नये. मला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही देखील माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आपले गुरु मानत होतात आज देखील त्यांना नतमस्तकह होतात. परंतु बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मात्र तुम्ही विसरलात आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल लोकसभेमध्ये तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर देखील देता आलं नाही आणि त्यावरून हशा पिकला आणि महाराष्ट्राची मान खाली गेली याबद्दल त्यांनी विचार करावा, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
