राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांवर संतपाले; म्हणाले, “मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र…”

| Updated on: May 29, 2023 | 10:09 AM

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Follow us on

अहमदनगर : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंकडे पक्ष शिल्लक राहिला नाही.सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्वाचे तत्व सोडले.राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली.मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येऊन काहीही फरक पडणार नाही. ही सत्तेसाठी द्वेषाने पछाडलेली मंडळी आहेत. देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. त्यामुळे 2024 ला मागील रेकॉर्ड तोडून अधिक जागा जिंकत भाजप सत्तेत येणार, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.