Rahul Gandhi At Goa | राहुल गांधींचा गोव्याचा प्रवास, जोरदार चर्चेचा विषय

| Updated on: Oct 30, 2021 | 6:21 PM

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भाजपसह, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसनंही दंड थोपटले आहेत. अशावेळी आता काँग्रेसनंही जोर लावायला सुरुवात केलीय.

Follow us on

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. भाजपसह, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसनंही दंड थोपटले आहेत. अशावेळी आता काँग्रेसनंही जोर लावायला सुरुवात केलीय. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी गोव्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी दुचाकीवरुन प्रवास करताना पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

गोव्यात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी गोव्यातील मोटारसायकल टॅक्सी पायलटची सवारी केली. यावेळी पणती ते फोंटा दरम्यान त्यांनी दुचाकीवरुन प्रवास केला. सुरक्षाव्यवस्था नाकारुन राहुल गांधी यांनी दुचाकीवरुन प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. दुचारी प्रवासाचा राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. दरम्यान, देशात यूपीए सरकार होतं तेव्हा पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे भाव यूपीए काळापेक्षाही स्वस्त आहेत. पण लोकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केलीय.