अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!
राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या प्रचंड वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मोदींच्या काळातच ते मोठे झाल्याचा आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्था विस्तारल्याने अनेक उद्योगांची वाढ झाल्याचे आकडेवारीसह सांगत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मुंबई विमानतळाच्या भवितव्यावरूनही दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या वाढीचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातच अदानींचा मोठा विस्तार झाल्याचा आरोप केला. राज ठाकरेंनी अदानींच्या उद्योगांच्या विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचा दावा खोडून काढला.
फडणवीस यांनी सांगितले की, २०१४ मध्ये भारत जगातील ११ वी अर्थव्यवस्था होती, ती आता तिसरी बनली आहे. अर्थव्यवस्था विस्तारल्यामुळे टाटा, एचडीएफसी, एल अँड टी, इन्फोसिस यांसारख्या अनेक उद्योगांचीही प्रचंड वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. अदानींच्या काँग्रेसशासित राज्यांमधील गुंतवणुकीचा उल्लेख करत, उद्योगांना नाकारल्यास रोजगार कसा मिळेल असा सवाल फडणवीस यांनी केला. मुंबई विमानतळ अदानींना विकण्याचा राज ठाकरेंचा आरोपही फडणवीस यांनी फेटाळून लावला, तसेच मुंबई विमानतळाची क्षमता दीडपट वाढवणार असल्याचे स्पष्ट केले.