Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार? माझी परवानगी घ्या मगच… राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकार्यांना दिले आहेत. युतीवर बोलण्याआधी मला विचारा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत मनसेनिकांमध्ये समरसता पाहायला मिळतो.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन वेगवेगळ्या आदेशाने ठाकरेंच्या युतीबद्दल तर्क वितर्क सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल बोलू नका, असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंची ही सावध भूमिका असल्याचे बोललं जात आहे. राज ठाकरेंच्या या आदेशाचे दोन वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात अशी शंका राज ठाकरे यांना असल्याची चर्चा आहे. मेळावा हा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता असाही एक अर्थ राज ठाकरेंच्या आदेशातून निघतोय. उद्धव ठाकरे मात्र मराठीसाठी जे जे करायला लागेल ते ते करायला तयार असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या विरोधात न बोलण्याचे आदेश प्रवक्ते आणि नेत्यांना दिले आहेत. ठाकरेंच्या मेळाव्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेकडून फक्त उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधत राज ठाकरेंची स्तुती केली गेली. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल अद्याप स्पष्टता नसल्याने राज ठाकरेंना न दुखावण्याचे शिंदेंच धोरण आहे.
