युतीसंदर्भात काय ते मी बघेन, तुम्ही.. ; मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

युतीसंदर्भात काय ते मी बघेन, तुम्ही.. ; मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

| Updated on: Jul 15, 2025 | 4:02 PM

इगतपुरीत सुरू असलेल्या मनसेच्या शिबिरात राज ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी

इगतपुरीत कालपासून मनसेच शिबिर सुरू झालं आहे. या शिबिरात राज ठाकरे युती संदर्भात काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेसोबतच्या युतीबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहे.

मतदार याद्यांवर बारीक काम करा, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिरात त्यांनी या सूचना केलेल्या आहेत. कालपासून हे शिबिर सुरू झालं असून या शिबिरात राज्यभरातून मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत.  त्याचबरोबर माध्यमांशी काय बोलायला हवं आणि काय नाही, यासंदर्भात देखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना धडे दिले आहे. तसंच उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन. त्यावर योग्य वेळी मी बोलेन. तुम्ही काहीही बोलायचं नाही, अशाही महत्वाच्या सूचना राज ठाकरेंनी या शिबिरात दिल्या आहे.

Published on: Jul 15, 2025 04:02 PM