मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली , उत्तर प्रदेश पर्यंत तपास करण्यात आला , यात राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. सत्ताधारीची लोक दिवसा ढवळा लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आहे. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय.. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे.. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात बांधिल नसतात.. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही, नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांची भेट घेणार- राज ठाकरे