Raj Thackeray : एकाच ठिकाणी राहा… स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाचे पदाधिकारी रमेश परदेशी ऊर्फ पिट्याभाई यांना संघाच्या गणवेशातील फोटोवरून प्रश्न विचारल्याची चर्चा आहे. पुण्यातील बैठकीत हा प्रकार घडला. दसरा मेळाव्याला पोस्ट केलेल्या फोटोबद्दल राज ठाकरेंनी विचारणा केली. परदेशींनी मात्र, साहेबांनी केवळ विचारणा केली, रागवले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी रमेश परदेशी, जे मुळशी पॅटर्न चित्रपटातील पिट्याभाई नावाने ओळखले जातात, त्यांना संघाच्या गणवेशातील एका फोटोवरून सवाल केल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यात आयोजित एका बैठकीदरम्यान हा प्रसंग घडला.
गेल्या दसरा मेळाव्याला रमेश परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनातील आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. संघशक्ती युगेयुगे असे शीर्षकही त्यांनी त्या फोटोंना दिले होते. या फोटोवरून राज ठाकरे यांनी परदेशींना विचारले की, “जर तू छातीठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, तर मग इकडे कशाला टाइमपास करतो? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा.”
मात्र, या घटनेनंतर पिट्याभाईंनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, राज ठाकरेंनी केवळ त्या फोटोबद्दल विचारणा केली; ते रागावले नव्हते. राज साहेबांचा स्वभाव मिश्किल असून त्यांनी फक्त चौकशी केली, असे परदेशींनी म्हटले आहे. ते पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
