Gunaratna Sadavarte : .. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याने धमकी दिली आहे. या धमकीच्या फोनचं ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतं आहे.
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्याने धमकी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्त्यांनी ही धमकी दिली आहे. गाडी फोडण्याची धमकी मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांना दिली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांने ही धमकी दिली आहे. या धमकीच्या फोनचं ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतं आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही9 मराठी करत नाही.
राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं विधान कसं करता असा जाब या कार्यकर्त्याने सदावर्ते यांना विचारला आहे. मात्र सदावर्ते ऐकत नसल्याचं पाहून या कार्यकर्त्याने थेट त्यांना उद्या तुमच्या घरावर हल्ला झाला तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल अशी धमकी दिली आहे.
Published on: Jun 19, 2025 06:45 PM
