Thackeray Brothers : राज मातोश्रीवर अन् ठाकरेंसोबत बैठक! दिवसभरात दोनदा भेट, पण का? अर्ध्या तास काय चर्चा?

Thackeray Brothers : राज मातोश्रीवर अन् ठाकरेंसोबत बैठक! दिवसभरात दोनदा भेट, पण का? अर्ध्या तास काय चर्चा?

| Updated on: Oct 06, 2025 | 11:20 AM

राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची अर्धा तास भेट घेतली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. दोघांमध्ये गुप्तता पाळत झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट सुमारे अर्धा तास चालली, ज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आणि 3 वाजून 10 मिनिटांनी ते बाहेर पडले. या भेटीदरम्यान कोणताही अन्य नेता उपस्थित नव्हता आणि याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

या भेटीच्या काही वेळापूर्वी, दोन्ही ठाकरे बंधू संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. तिथे राज ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात संवादही झाला. उद्धव ठाकरेंनी आम्ही दोघे भाऊ यापुढे एकत्रच राहणार अशी घोषणा केली असली तरी, मनसेकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Published on: Oct 06, 2025 11:20 AM