Rajnath Singh : त्यांनी धर्म विचारला, आम्ही कर्म पाहिले; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर थेट हल्ला
Rajnath Singh Speech On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानचं नाव घेऊन थेट टीका केली आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांच्या ‘धर्म’ बद्दल विचारल्यानंतर मारले. त्यांच्या ‘कर्माच्या’ आधारे त्यांना नष्ट करण्यात आले, हा आपला ‘भारतीय धर्म’ आहे, असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचं नाव घेऊन थेट हल्लाबोल केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलं आहे.
पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान जिथे उभा राहतो तिथे भिकाऱ्यांची रांग सुरू होते. आज भारत अशा देशांमध्ये समाविष्ट आहे जे आयएमएफला निधी देतात जेणेकरून आयएमएफ गरीब देशांना कर्ज देऊ शकेल. भारताबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे की आपण नेहमीच शांततेला प्राधान्य दिले आहे. आपण सहसा कधीही युद्धाच्या बाजूने नव्हतो, परंतु जेव्हा परिस्थिती इतकी गंभीर होते, देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होतो, तेव्हा प्रत्युत्तर देणे आवश्यक होते, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना म्हंटलं.
