Raju shetti | राजू शेट्टी वर्षा बंगल्यावर दाखल

| Updated on: Sep 06, 2021 | 3:27 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले आहेत. महापुरामुळे शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. त्यांचं बुडीत शेतीचं कर्ज माफ करा. केवळ ट्विट करून निर्णय घेत असल्याचं सांगू नका. तर कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जीआर जारी करा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. 

Follow us on

राजू शेट्टी यांच्या पंचगंगा परिक्रमा आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार शेट्टी मुंबईत आले असून मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. वर्षभरापासून शेतकरी अडचणीत आले आहेत. अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि महापूराने त्रस्त आहे. सरकारने दीड वर्षापूर्वी 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे पैसे शेतकऱ्यांना आता ताबडतोब द्या. महापुरात शेती बुडाली आहे. त्यामुळे 2019च्या धर्तीवर बुडीत कर्ज माफ करा. पीकच शिल्लक नाही तर कर्ज भरणार कसं? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी केवळ ट्विट करून चालणार नाही. शासन निर्णय झाला पाहिजे. सरकारने जीआर काढून जबाबदारी घ्यावी आणि बँकांना तसे कळवावं, असं शेट्टी म्हणाले.